मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी लोणार सरोवराला दिली भेट

0
29


मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी आज वनकुटी व्ह्यू पॉईंट येथून लोणार सरोवराची (Lonar)पाहणी केली असून यावेळी त्यांनी लोणार सरोवराची माहिती जाणून घेतली. लोणार सरोवर हे जैवविविधतेचे भांडार आहे. या सरोवराचा विकास करताना एक निश्चित नियोजन तयार करावे, त्यानुसार आराखडा तयार करावा अन त्याची काटेकोर अंमलबजावणी केली तरच हे सरोवर पर्यटनासाठी नावारूपास येईल, असे मत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केले. याठिकाणी मंदिरांची संख्या अधिक असल्याने वन पर्यटन किंवा मंदिराच्या भेटी यापैकी एका पर्यायाची निवड करून त्याच प्रस्तावावर काम करावे. येथील वनसंपदा धोक्यात येऊ नये,यासाठी मर्यादित प्रवेश ठेवावा. लोणार सरोवराचा विकास रणथंबोरच्या धर्तीवर करू शकतो का याची पडताळणी करावी,असेही मुख्यमंत्री म्हणाले.

  • मुख्यमंत्र्यांनी लोणार सरोवर येथील वनकुटी व्ह्यू पॉईंटला दिली भेट
  • पर्यटकांसाठी सरोवराच्या बाजूला एक पायरस्ता ठरवा
  • मुख्यमंत्र्यांनी दिल्या सूचना
  • पाहणीसाठी मुख्यमंत्र्यांसोबत अनेक कार्यकर्ते उपस्थित

https://www.instagram.com/reel/CK56_5rpN2t/?igshid=iw8ryf14ebx1