कचऱ्यात फेकलेल्या 1 दिवसाच्या बाळाला जीवदान, पोलीस निरीक्षक मधुरा कोराणेंचं गृहमंत्र्यांकडून कौतुक

0
46

कात्रज घाटातील कचऱ्यात एका बाळाला फेकून दिल्याची माहिती पोलिसांना मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेतली. अरिहंत शाळेच्या परिसरात हॉलिडे रिसॉर्टच्या पुढे भिलारेवाडी ग्रामपंचायतीच्या हद्दीत हे बाळ फेकून देण्यात आले होते. भारती विद्यापीठाच्या पोलिसांनी जबाबदारीचे भान राखत घटनास्थळावरून त्या एका दिवसाच्या बाळाला ताब्यात घेतले. त्यानंतर पोलीस निरीक्षक मधुरा कोराणे यांनी बाळाला मायेने जवळ घेतले आणि दुचाकीवरून बाळाला ससून रुग्णालयात दाखल केले. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर त्यांचा व्हायरल झाला. त्यांच्या कृतीचं सोशल मीडियावर भरभरून कौतुक होत आहे. गृहमंत्री अनिल देशमुख यांनीही हा फोटो ट्विट करुन त्यांचे आभार व्यक्त केले आहेत.