गलवान खोऱ्यात सैनिक मारले गेल्याचं, चीनने पहिल्यांदा केलं मान्य

0
50

चीनच्या अधिकृत वृत्तपत्र ग्लोबल टाईम्सने चीनी सैन्याच्या अधिकृत वृत्तपत्र पीएलए डेलीचा हवाला देत म्हटले आहे की चीनने प्रथमच ‘त्यांच्या सार्वभौमत्वाच्या रक्षणासाठी बलिदान झालेल्या सैनिकांना श्रद्धांजली वाहण्यासाठी त्यांच्याविषयी नावे व तपशील’ दिले आहेत. पीएलए डेलीने शुक्रवारी आपल्या अहवालात लिहिले आहे की चीनच्या केंद्रीय सैन्य आयोगाने काराकोरम पर्वतावर चीनच्या पाच अधिकारी व सैनिकांची ओळख करून दिली आहे आणि त्यांचा सन्मान केला. अहवालात पहिल्यांदाच, चिनी सैन्याने गॅलवान संघर्षाचा सविस्तर अहवाल दिला आहे आणि ‘भारतीय सैन्याने तेथे मोठ्या संख्येने सैनिक पाठवले होते जे लपून बसले होते आणि चीनच्या सैन्याला माघार घ्यायला भाग पाडत होते’ असे वर्णन केले आहे.