बीबीसी वर्ल्ड सर्व्हिसच्या कार्यक्रम प्रक्षेपणावर चीनने घातली बंदी

0
36

चीनने बीबीसी वर्ल्ड सर्व्हिसच्या कार्यक्रमांच्या प्रक्षेपणावर बंदी घातली आहे. बीबीसी चुकीची आणि खोटी पत्रकारिता करत असल्याचा आरोप चीननं केला आहे. गेल्या आठवड्यात ब्रिटनचं माध्यम नियमक मंडळ ऑफकॉमने चीनच्या सरकारी नियंत्रणात येणारं चॅनल सीजीटीएनचं प्रक्षेपण बंद केलं होतं. “चीनच्या या निर्णयामुळे फारसा फरक पडणार नाही कारण चीनमध्ये बहुतांश लोकांसाठी ही वाहिनी आधीपासूनच उपलब्ध नव्हती”, अशी प्रतिक्रिया बीबीसीच्या आशिया विभाग संपादकांनी दिली आहे.