गलवान खोऱ्यातील हाणामारीचा व्हिडिओ जारी; भारतीय सैनिकांवर चीनचे आरोप

0
60

लडाखच्या गलवान खोऱ्यात जून 2020मध्ये भारतीय सैनिकांसोबक झालेल्या हाणामारीत चीनी सैनिक मारले गेल्याची कबुली चीनने दिली आहे. यापूर्वी चीन ही बाब वारंवार नाकारत होता. आता एक व्हिडिओ जारी करून त्यांनी याबाबतची कबुली दिली आहे. मात्र आंतरराष्ट्रीय स्तरावर आपली बाजू मांडण्यासाठी त्यांनी या हाणामारीचे काही व्हिडिओ एडिट करुन पोस्ट केल्याचे यात दिसत आहे. भारत आणि आंतरराष्ट्रीय दबावामुळे चीनला या आठवड्यात माघार घ्यावी लागली आहे. त्यानंतर चीन व्हिडिओमार्फत कांगावा करण्यास सुरुवात केली आहे. विशेष म्हणजे या व्हिडिओत भारताचा उल्लेख केलेला नाही. विदेशी सेनेने कराराचं उल्लंघन करत सीमा पार करत रस्ते निर्मितीचे काम हाती घेतल्याचा आरोप या व्हिडिओत करण्यात आला आहे. अर्थात चीनने व्हिडिओच्या माध्यमातून हा संपूर्ण एकतर्फी बनाव रचल्याचं दिसत आहे.