भारतीय कोरोना व्हॅक्सिन फॉर्म्युला चोरण्याचा चीनचा प्रयत्न

0
36

कोरोना व्हॅक्सिन तयार करणाऱ्या भारतीय कंपन्या चीनी हॅकर्सच्या रडारवर आहेत. व्हॅक्सिन निर्मिती करणाऱ्या आयटी सिस्टीमला हॅकर्सने टार्गेट करून माहिची चोरण्याचा प्रयत्न केला. चीनमधील एका हॅकर्स ग्रुपने हा प्रयत्न केला आहे. भारताची कोरोना व्हॅक्सिन पुरवठा साखळी खंडीत करण्याचा हॅकर्सचा मानस आहे.
भारत आणि चीनकडून वेगवेगळ्या देशात कोरोना व्हॅक्सिनचा पुरवठा केला जात आहे. जगातील व्हॅक्सिनचं सर्वाधिक म्हणजे 60 टक्के उत्पादन हे एकट्या भारतात केले जाते. त्यामुळे चीनने पुन्हा एकदा कुरापती करण्यास सुरुवात केली आहे. पुरवठा साखळी खंडीत करण्यासाठी आयटी सिस्टमवर अटॅक करण्याचा प्रयत्न केला आहे.