चित्रा वाघ बीकेसी पोलीस ठाण्यात; मुंबई पोलिसांकडे कारवाईची मागणी

0
75

पुजा चव्हाण आत्महत्या प्रकरणाने महाराष्ट्रात चांगलेच राजकारण तापले आहे. या मुद्द्यावर भाजपा नेत्या चित्रा वाघ यांनी संजय राठोड यांचे नाव घेत सातत्याने राज्य सरकारवर चांगलाच निशाणा साधला आहे. मात्र, संजय राठोड यांच्यावर आक्रमकपणे टीका करणाऱ्या चित्रा वाघ यांचा मॉर्फ फोटोने सोशल मिडीयावर चांगलाच धुमाकूळ घातला आहे.

याप्रकरणी चित्रा वाघ यांनी आज बीकेसी पोलीस ठाण्यात सायबर विभागाच्या पोलीस उपायुक्त रेश्मी करंदीकर यांच्याकडे तक्रार दाखल केली आहे. चित्रा वाघ यांनी फोटोंसंदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याकडे देखील तक्रार केली होती.