चित्रा वाघ यांचा ठाकरे सरकारला खोचक सवाल

0
39

सध्याची चर्चेत आलेली घटना म्हणजे मुकेश अंबानी यांच्या घराजवळ स्फोटकं असलेली गाडी घराबाहेर कुणी उभी केली, या प्रकरणाचा तपास सध्या सुरू असताना या गाडी मालकाचा संशयास्पद मृत्यू झाला. यावरून या घटनेवर मत मांडत भाजपाच्या प्रदेश उपाध्यक्षा चित्रा वाघ यांनी मागील घटनांचा संदर्भ देत सरकारला सवाल केला आहे.

“महाराष्ट्रात गेल्या काही महिन्यात असे अनेक मृत्यू झाले. कधी कुणी सेलीब्रीटी तर कधी कुणी एखादी मुलगी आणि आता मनसुख हिरेन… प्रत्येक मृत्यूमागे एक रहस्य… आणि रहस्यातून बाहेर पडताहेत अनेक धक्कादायक मती गुंग करणाऱ्या गोष्टी… सगळ्या प्रकरणांची निष्पक्ष चौकशी होईल ना?,” असा खोचक सवाल चित्रा वाघ यांनी केला आहे.