सीएम केजरीवाल यांचा 26 फेब्रुवारीला सूरतमध्ये रोड शो

0
39

गुजरातमधील स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकीत आम आदमी पार्टीला जनतेने साथ दिल्याचे पाहायला मिळत आहे. सूरत महानगरपालिकेत प्रमुख विरोधी पक्ष म्हणून आम आदमी पक्षाला मतदारांनी पसंती दिली आहे. सूरतमध्ये भाजपाने 93 जागांवर, तर आपने 27 जागांवर विजय मिळवला आहे. काँग्रेसला खातंही खोलता आले नाही. सूरतमधील आम आदमी पक्षाच्या प्रदर्शनावर दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी आनंद व्यक्त केला आहे. त्यामुळे गुजरातमधील राजकारणात आपने एन्ट्री मारल्याचे दिसत आहे. यासाठी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल 26 फेब्रुवारीला सूरतमध्ये रोड शो करणार आहे.