मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत शिवसेनेची उद्या पॉवरफूल बैठक

0
31

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत मंगळवारी दुपारी १२ वाजता वर्षा बंगल्यावर शिवसेनेची पाँवरफूल बैठक होणार आहे. या बैठकीत शिवसेनेचे सर्व मंत्री, आमदार, खासदार, राज्यातील सर्व जिल्हा संपर्क प्रमुख आणि जिल्हा प्रमुख उपस्थित रहाणार आहेत. शिवसेनेचा मुख्यमंत्री झाल्यानंतर शिवसेनेची ही पहिलीच पाँवरफूल बैठक आहे. या बैठकीत राज्यात शिवसेना पक्ष अधिक बळकट करण्यासाठी महत्वाची चर्चा होणार आहे. नुकत्याच झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत शिवसेनेनं घवघवीत यश मिळवलंय. आता सरपंच निवडणूक आणि राज्यातील पाच महानगरपालिकांच्या प्रलंबित निवडणुका होणार आहेत. यासाठी शिवसेनेची रणनिती ही या बैठकीत ठरू शकते. सध्या वादात सापडलेले आणि गेले काही दिवस अज्ञात वासात असलेले वन मंत्री संजय राठोड या बैठकीत उपस्थित रहाणार का…? याकडेच सर्वांचं लक्ष असणार आहे.