कोरोनाबाबत मुख्यमंत्र्यांनी बोलावली महत्तवपूर्ण बैठक

0
36

राज्यात कोरोनाची परिस्थिती अत्यंत गंभीर होताना दिसत आहे. दरदिवशी कोरोना रुग्णांची संख्या 4 हजारच्या आसपास येताना दिसत आहे. त्याअनुशंगाने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज सर्व जिल्हाधिकाऱ्यांसमवेत आढावा बैठक बोलावली आहे. कोरोनाला अटकाव करण्यासाठी काय-काय उपाययोजना करता येतील, याबाबत बैठकीत चर्चा होणार असल्याची माहिती मिळत आहे. सोमवारी 3365 रुग्णांची राज्यात वाढ झाली असून कोरोना पुन्हा एकदा राज्यात वेगानं पसरत आहे.