सीएम ऑन अॅक्शन मोड; मुंबई महापालिका आयुक्तांसोबत बैठक

0
29

गेल्या काही दिवसात कोरोना रुग्णांची संख्या वाढल्याने प्रशासनाच्या चिंतेत वाढ झाली आहे. त्यात मुंबईत वाढलेली गर्दी, मास्क न वापरणे आणि सोशल डिस्टन्सिंगचे नियम पायदळी तुडवल्याचे जागोजागी दिसत आहेत. त्यामुळे कोरोना रुग्ण वाढण्याची भिती व्यक्त होत आहे. त्यावर आळा घालण्यासाठी प्रशासनाकडून ठोस पावलं उचलली जात आहेत. मास्क न घालण्याऱ्यांवर दंडात्मक कारवाई केली जात आहे. तसेच सोशल डिस्टन्सिंग न पाळण्याऱ्या कार्यक्रमांवर महापालिका अधिकाऱ्यांची करडी नजर आहे. मुख्यमंत्र्यांनीही नागरिकांना कोरोनाची नियमावली पाळण्याचे आदेश दिले आहेत. मात्र नागरिकांचा निष्काळजीपणा भविष्यातील चिंता वाढवणारा आहे. त्यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे मुंबई महापालिका आयुक्त आणि अधिकाऱ्यांसोबत बैठक घेऊन कोरोना स्थितीचा आढावा घेणार आहेत. या बैठकीत पुढच्या नियोजनाबाबत चर्चा करण्यात येणार आहे. कोरोनावर आळा घालण्यासाठी या बैठकीत उपाययोजना मांडण्यात येणार आहेत.