मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत शिवनेरी शिवजयंती सोहळा

0
43

पुणे जिल्ह्यातील शिवनेरी किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत जन्मसोहळा पार पडला. राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे आणि खासदार संभाजीाराजे यावेळी उपस्थित होते.

कोरोनाच्या वाढत्या फैलाावामुळे यंदा निवडक शिवभक्तांच्या उपस्थितीत शिवजयंती सोहळा पार पडतोय. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते 391 वृक्षांचे वक्षारोपण करण्यात येणार आहे. तसेच शिवयोग या विशेष टपाल तिकीटाचे प्रकाशन करण्यात येणार आहे. गडांवर आणि शहरांतील चौका-चौकांमध्ये शिवजयंतीनिमित्त विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. रायगडावरही विद्युत रोषणाई नेत्रदिपक रोषणाई केली आहे.