गुजरातचे सीएम विजय रुपाणी कोरोना पॉझिटिव्ह

0
33

गुजरातचे मुख्यमंत्री विजय रुपाणी कोरोनाची लागण झालीय. मुख्यमंत्री विजय रुपाणी रविवारी निवडणूक प्रचारासाठी वडोदरा येथील निजामपुरा येथे गेले होते. प्रचारसभेत भाषण करताना स्टेजवर भोवळ येऊन शुद्ध हरपली होती. त्यानंतर यूएन मेहता रुग्णालयात दाखल केले आहे. तिथे त्यांना कोरोनाची लागण झाल्याचे समोर आलं आहे. रुपाणी यांची प्रकृती स्थिर असल्याचे डॉक्टरांनी सांगितले आहे.