कॉमेडियन मुनव्वर फारुखीला सुप्रीम कोर्टात जामीन मंजूर

0
48

कॉमेडियन मुनव्वर फारुखीला सर्वोच्च न्यायालयाने जामीन मंजूर केला. त्याच्यावर धार्मिक भावना दुखावल्याचा आरोप होता. मध्य प्रदेश उच्च न्यायालयाने जामीन फेटाळण्याच्या आदेशाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले होते. एका कार्यक्रमादरम्यान हिंदू देवतांबद्दल आक्षेपार्ह भाष्य करून फारुखीवर धार्मिक भावना दुखावल्याचा आरोप होता. सुप्रीम कोर्टाचे न्यायमूर्ती आर. एफ. नरिमन अन न्यायमूर्ती बी.आर. गवई यांच्या खंडपीठासमोर फारुखीच्या याचिकेवर सुनावणी झाली.

  • कॉमेडियन मुनव्वर फारुखी याला सुप्रीम कोर्टात जामीन मंजूर
  • धार्मिक भावना दुखावल्याचा होता आरोप
  • मध्य प्रदेश हायकोर्टाने जामीन फेटाळला होता

Photo: मुनव्वर फारुखी