इंधन दरवाढीविरोधात काँग्रेसचे सायकल आंदोलन; आंदोलनवर भाजपाचे तोंडसुख

0
43

अर्थसंकल्पीय अधिवेशनच्या पहिल्या दिवशी इंधन दरवाढीविरोधात काँग्रेसने निदर्शन केले. मंत्रालयासमोरील राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या पुतळ्याला अभिवादन करुन काँग्रेस नेत्यांनी सायकलवरून विधानभवन गाठले. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या नेतृत्वाखालील आंदोलनात, महसूलमंत्री बाळासाहेब थोरात आणि इतर काँग्रेस नेते यात सहभागी झाले होते.
यावेळी प्रसारमाध्यमांशी बोलताना नाना पटोले म्हणाले की, आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाचे दर निचांकी पातळीवर असताना केंद्र सरकार इंधनावर भरमसाठ करवाढ करत लुट करत आहे. त्यात आणखी १८ रुपये रस्ते विकास सेसच्या माध्यमातून तर ४ रुपये कृषी सेसच्या माध्यमातून घेतले जात आहेत. करांशिवाय आज पेट्रोलची किंमत 32 रुपये 72 पैसे प्रति लिटर आणि डिझेलची किंमत 33 रुपये 46 पैसे प्रति लिटर आहे. पण मोदी सरकारने डिझेलवर 820 टक्के तर पेट्रोलवर 258 टक्के एक्साईज ड्यूटी लावून पेट्रोलचे दर 100 रुपये लिटर वर तर डिझेलचे दर 90 रुपये लिटरपर्यंत वाढवले आहेत. मुंबईत पॉवर पेट्रोलचे दर 100 रुपयांच्या वर गेले आहेत.

दूसरीकडे काँग्रेस राज्यात इंधनाचे दर जास्त असल्याचा टोला विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी लगावला आहे. राज्यातील दर कमी करण्यासाठी काँग्रेस आंदोलन करत असल्याची टीका त्यांनी केली.