काँग्रेस नेते राहुल गांधी यांची वायनाडमध्ये ट्रॅक्टर रॅली 

0
27

केरळमधील वायनाड या लोकसभा मतदारसंघात राहुल गांधी यांचा दौरा आहे. या दौऱ्यात राहुल गांधींनी केंद्र सरकार अन पंतप्रधान नरेंद्र मोदी व अमित शहांवर हल्लाबोल केला. जगभराने दिल्लीतील शेतकरी आंदोलनाची दखल घेतली. मात्र दिल्लीतील केंद्र सरकारला अद्यापही शेतकऱ्यांच्या आंदोलनाची दखल घ्यावी वाटत नाही. शेती हा एकमेव शेतकऱ्यांचाच उद्योग-व्यवसाय आहे. भारत मातेशी संबंधित उद्योग आहे, इतर प्रत्येक व्यवसाय हे इतरांशी निगडीत असतात. पण शेती या उद्योगावरही आपले वर्चस्व गाजवण्याचा प्रयत्न काही लोकांकडून होत आहे. या दोन ते तीन लोकांसाठीच केंद्र सरकारने 3 शेतकरी कायदे केले आहेत असा आरोप राहुल गांधींनी केला आहे.तसेच काँग्रेस नेते राहुल गांधी हे वायनाडच्या ट्रॅक्टर रॅलीमध्ये सुद्धा सहभागी झाले.