‘सोशल मीडिया वॉरियर्स’साठी काँग्रेसची तयारी

0
38

काँग्रेस पक्षाने कात टाकत सोशल मीडिया आणखी मजबूत करण्याचा निर्णय घेतला आहे. सोशल मीडिया वॉरियर्स टीमसोबत जोडण्यासाठी एक टोल फ्री टोल नंबर जाहीर केला आहे. व्हॉट्सअॅप, वेबसाईट आणि ईमेलने या टीमसोबत सहभागी होता येणार आहे. काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी एका व्हिडिओद्वारे या अभियानासोबत एकत्र येण्याचे आवाहन केले आहे.

‘टीम न्यायासाठी लढण्याऱ्या योद्ध्यांची आहे. ही तिरस्काराचे राजकारण करणारी सेना नाही. हिंसाचार करणारी सेना नाही. ही सत्याची सेना आहे. भारतीय विचारांचं संरक्षण करणारी टीम आहे.’

वरिष्ठ नेते पवन कुमार बंसल, प्रवक्ता पवन खेडा आणि पक्षाचे सोशल मीडिया प्रमुख रोहन गुप्ता यांनी या अभियानाची सुरुवात केली आहे. 5 लाख सोशल मीडिया वॉरियर टीमसोबत सहभागी करण्याचे लक्ष्य आहे.