शेतकऱ्यांसोबत काँग्रेस भक्कमपणे उभा आहे – नाना पटोले

0
19

आज काँग्रेसने कृषी कायद्यांविरोधात भव्य बैलगाडी आणि ट्रॅक्टर रॅली काढली होती. यावेळी भंडाऱ्यात महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी मोदी सरकारवर सडकून टीका केली. “मोदी सरकारने कृषी कायदे रद्द करावेत या मागणीसाठी लाखो शेतकरी अडीच महिन्यांपासून दिल्लीच्या सीमांवर आंदोलन करत आहे. शेतकऱ्यांशी चर्चा करण्याची भाषा मोदी सरकार करत असताना त्याचवेळी शेतकरी दिल्लीत येऊ नये म्हणून रस्त्यावर मोठे खिळे ठोकले जातात. या शेतकऱ्यांसोबत काँग्रेस भक्कमपणे उभा आहे. असं वक्तव्य नाना पटोले यांनी केलं आहे. तसेच “शेतकऱ्यांच्या मागण्या रास्त असून या आंदोलनाला महाराष्ट्रातून मोठे बळ देऊ”, असे नाना पटोले यांनी म्हटले आहे.
दिल्लीत आंदोलन करत असलेल्या शेतकऱ्यांना पाठिंबा देण्यासाठी भंडारामध्ये आज काँग्रेसने भव्य बैलगाडी व टॅक्टर रॅली काढली. या रॅलीला नाना पटोले संबोधित करत  होते. यावेळी आमदार अभिजित वंजारी, प्रदेश प्रवक्ते अतुल लोंढे, भंडारा काँग्रेस कमिटीचे जिल्हाध्यक्ष मोहन पंचभाई, प्रदेश सरचिटणीस झिया पटेल यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते मोठे संख्येने उपस्थित होते.