चंद्रकांत पाटलांच्या अजब दाव्यावर काँग्रेसने साधला निशाणा; भविष्यात मोदींमुळे विश्वाची…. 

0
53

पंतप्रधान नरेंद्र मोदी अन बीजेपी मुस्लिमविरोधी कसे नाहीत यावर बोलतांना भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी एक अजब विधान केले आहे यावर सध्या चर्चेला उधाण यायला सुरुवात झालीये. ‘नरेंद्र मोदी यांनीच अब्दुल कलाम यांना राष्ट्रपती केले. मुस्लिम होते म्हणून त्यांना बाजूला ठेवलं नाही,’ असं चंद्रकांत पाटील यांनी म्हटले आहे. भारतीय जनता युवा मोर्चाच्या ‘युवा वॉरियर्स’ अभियानाचा शुभारंभ चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते पुण्यात झाला. त्यावेळी ते बोलत होते. मात्र यावर आता आरोप प्रत्यारोप सुरुवात झाली आहे. काँग्रेसचे सचिन सावंत यांनी चंद्रकांत पाटील यांच्यावर टीका केली असून त्यांच्या अजब दाव्यावर प्रश्न उपस्थित केला आहे. ते म्हणाले ‘एपीजे अब्दुल कलाम राष्ट्रपती झाले तेव्हा मोदींमुळे झाले हे सांगितले नाही.आता अटलजी व एपीजे अब्दुल कलाम ही नाहीत. चायवाला म्हणून व पदवी घेताना कोणी पाहिले नाही. मोदींच्या बाललीलांचे पुरावे द्यायचे नसल्याने भविष्यात मोदींमुळे विश्वाची उत्पत्ती झाली असे ही चंद्रकांत पाटील बोलू शकतील’ यावर चंद्रकांत पाटील उत्तर देतात का याकडे लक्ष लागून आहे.