खारघर पोलीस स्टेशन हवालदार संतोष पाटील यांनी आत्महत्या केली आहे. ते 47 वर्षाचे होते. सरस्वती हौ. सोसा.मधील त्यांच्या राहत्या घरी गळफास घेऊन त्यांनी आपलं जीवन संपवलं. त्यांच्या आत्महत्येचं कारण अद्याप अस्पष्ट आहे. संतोष पाटील हे काही दिवसापासून आजारी असल्याने गैरहजर होते. त्यांच्या पश्चात पत्नी आणि 2 मुली आहेत. पाचोरा या त्यांच्या मूळगावी त्यांच्यावर अंत्यसंस्कार होणार आहेत.