ऑनलाईन न्यूज पोर्टल सह कंटेंट प्रोवाइडर माहिती व प्रसारण मंत्रालयाच्या अंतर्गत ;आदेश जारी

0
26
  • देशात ऑनलाईन न्यूज माध्यमं आणि इतर ओटीटी प्लॅटफॉर्मवर अंकुश ठेवण्याचं काम यापुढे माहिती आणि प्रसारण मंत्रालयाकडून केलं जाईल
  • असं केंद्र सरकारकडून करण्यात आले आहे
  • डिजिटल न्यूज तसंच ‘नेटफ्लिक्स’सारख्या ओटीटी प्लॅटफॉर्मवर लक्ष ठेवण्यासाठी शासनाकडून एक अधिसूचना जारी करण्यात आलीय
  • राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्याकडून या अधिसूचनेवर स्वाक्षरी करण्यात आलीय
  • डिजिटल न्यूज, हॉटस्टार, नेटफ्लिक्स, अमेझॉन प्राइम व्हिडिओ यांसारख्या ‘स्ट्रीमिंग सर्व्हिसेस’चा समावेश ओटीटी प्लॅटफॉर्ममध्ये होतो
  • सध्या डिजिटल कंटेन्टवर नियंत्रण ठेवणारा कोणताही कायदा किंवा संस्था देशात अस्तित्वात नाही
  • त्यामुळे आता या कंटेन्टवर थेट माहिती आणि प्रसारण मंत्रालयाचं लक्ष राहणार आहे
  • ओटीटी प्लॅटफॉर्म वर लक्ष ठेवण्यासाठी स्वायत्त संस्थेची मागणी करणारी एक याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल करण्यात आली होती