मुंबईकरांनो सावधान! कोरोना पुन्हा डोकं वर काढतोय

0
31

कोरोनाचे रुग्ण कमी झाल्यानंतर भारतात अनलॉकची प्रक्रिया सुरु करण्यात आली. मुंबईतील लोकलमधील नियमही शिथील करण्यात आले. मात्र फेब्रुवारी महिन्यात पुन्हा एकदा कोरोनाने डोके वर काढले आहे. मुंबईत कोरोनाचे रुग्ण वाढत असल्याचे समोर आले आहे. त्यात नागरिक मास्क, सोशल डिस्टन्सिंगचे नियम पाळत नसल्याचे दिसत आहे. जर मुंबईकरांनी काळजी आणि कोरोनाचे नियम पाळले नाहीत, तर कोरोना पुन्हा हात पाय पसरेल अशी भिती तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे. कोरोना आता पिवळ्या रेषेपर्यंत पोहोचला असून लाल दिवा मिळेपर्यंत वाट पाहू नका असा इशाराही देण्यात आला आहे.

दुसरीकडे देशातही रुग्णांची संख्या पुन्हा एकदा वाढल्याचे दिसून येत आहे. गेल्या 24 तासात 13,193 नव्या रुग्णांची नोंद झाली असून 10,896 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर कोरोनामुळे एका दिवसात 97 जणांचा मृत्यू झाला आहे. आरोग्य मंत्रालयाने ही माहिती दिली आहे. आतापर्यंत एकूण 1 कोटी 9 लाख 63 हजार 394 जणांना कोरोनाची लागण झाली असून त्यापैकी 1 कोटी 6 लाख 67 हजार 741 जणांनी कोरोनावर मात केली आहे. कोरोनामुळे आतापर्यंत 1 लाख 56 हजार 111 जणांचा मृत्यू झाला आहे. देशात सद्यस्थितीत 1 लाख 39 हजार 542 अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. दुसरीकडे कोरोना फैलाव रोखण्यासाठी 1 कोटी 1 लाख 88 हजार 7 जणांचे लसीकरण करण्यात आले आहे.