शेअर बाजारात कोरोनाचे पडसाद

0
42

गेल्या काही दिवसांपासून कोरोना रुग्णांच्या वाढत्या संख्येचे परिणाम शेअर बाजारात दिसून आले. आठवड्याच्या पहिल्याच दिवशी सेन्सेक्स 1145 अंकांनी खाली आला असून 49744 अंकांवर स्थिरावला आहे. तर निफ्टी 306 अंकांनी खाली आला असून 14675 अंकांवर स्थिर झाला. शेअर बाजारातील निर्देशांक गेल्या पाच दिवसांपासून खाली पडत असल्याचे चित्र आहे. मेटल सेक्टर्स वगळता सर्व सेक्टर आज लाल निशाणाखाली बंद झाले. शुक्रवारीही बाजारात पडझड झाल्याचे चित्र होते. 2 फेब्रुवारीला पहिल्यांदा सेन्सेक्स 50 हजारांच्या खाली बंद झाला होता. युरोप, ब्रिटेन, फ्रान्स आणि जर्मनीतील शेअर बाजारातही कोरोनाचे पडसाद जाणवत आहेत.