लातुरच्या शालेय वसतिगृहातील ४० विद्यार्थ्यांना कोरोनाची लागण

0
48

लातूर: राज्यात कोरोनाचे रुग्ण दिवसेंदिवस वाढत आहेत. यामध्ये आता अनेक शहरात लॉकडाऊन लागले आहे. तसेच खुप ठिकाणी कडक निर्बंध लावले आहेत.यामध्येच आता लातूर शहरातल्या एमआयडीसी भागात असलेल्या एका शाळेच्या वसतिगृहातील 40 विद्यार्थ्यांना कोरोनाची लागण झाली. हे विद्यार्थी शिक्षणासाठी लातूरच्या या शाळेच्या वसतिगृहात रहायला आहेत. या शाळेतील 320 विद्यार्थी अन 10 शिक्षक आणि 20 इतर कर्मचारी यांना क्वारंटाईन करण्यात आले आहे.या प्रकारामुळे शाळेच्या इतर विद्यार्थ्यांची सुद्धा चाचणी करण्यात येणार असून शाळा परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे