लॉकडाऊन शिथील केल्यानंतर भारतात पुन्हा एकदा कोरोना रुग्ण वाढत असल्याने चिंता व्यक्त केली जात आहे. त्यात महाराष्ट्रात आढळलेला नवा कोरोना स्ट्रेन घातक असल्याचं मत डॉ. रणदीप गुलेरिया यांनी व्यक्त केले आहे. हा विषाणू झपाट्याने पसरू शकतो अशी भितीही त्यांनी व्यक्त केली आहे. अँटीबॉडीज तयार झालेल्या रुग्णांमध्येही हा विषाणू शिरकाव करून शकतो अशी भिती त्यांनी व्यक्त केली आहे.
महाराष्ट्रात कोरोनाचे 240 नवे स्ट्रेन आढळले आहेत. तर केरळ, मध्य प्रदेश, छत्तीसगड आणि पंजाबमध्येही कोरोनाचे रुग्ण वाढ आहेत. शासन व्हॅक्सिनेशनच्या माध्यमातून कोरोनाची साखळी तोडण्यासाठी हर्ड इम्युनिटी तयार करण्याचा प्रयत्न करत आहे. पहिल्या टप्प्यात तीन कोटी आरोग्य कर्मचाऱ्यांना लस दिली जाणार आहे. तर 50 हून अधिक वय असलेल्या आणि गंभीर आजारांनी ग्रस्त 27 कोटी नागरिकांचे लसीकरण केले जाणार आहे.