राज्यात पुन्हा कोरोना रुग्णसंख्येत वाढ, २४ तासात आढळले सहा हजारांच्या पार रुग्ण 

0
41

राज्यात करोनाने पुन्हा एकदा डोके वर काढले आहे. गेले काही दिवस कोरोना रुग्णवाढ झपाट्याने होताना दिसत आहे.याच पार्श्वभूमीवर अनेक जिल्ह्यात कडक निर्बंध लागले आहेत. आज राज्यात कोरोनाचे सहा हजारावर नवीन रुग्ण आढळले आहेत. गेल्या २४ तासांत राज्यात ६ हजार २१८ कोरोना बाधितांची भर पडली आहे तर त्याचवेळी ५ हजार ८६९ रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. दरम्यान, अॅक्टिव्ह रुग्णांची संख्या वाढत असून आज हा आकडा ५३ हजारपार गेला आहे. 

राज्यात आज ५१ करोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली असून आतापर्यंत या साथीच्या विळख्यात सापडून ५१ हजार ८५७ जणांचा मृत्यू झाला आहे. आज राज्यात ६ हजार २१८ नवीन रुग्णांचे निदान झाले आहे तर ५ हजार ८६९ रुग्ण करोनावर मात करून घरी परतले आहेत.यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९४.९६ टक्के एवढे झाले आहे.