वाशिममध्ये कोरोनाचा उद्रेक! तब्बल २२९ विद्यार्थ्यांना कोरोनाची लागण 

0
27

वाशिम : गेल्या काही दिवसांपासून राज्यात कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. यातच वाशिम जिल्ह्यात धक्कादायक कोरोना रुग्णसंख्या समोर येतीये. जिल्ह्यातील रिसोड तालुक्यातील देगावमधील निवासी शाळेतील चार शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि वसतिगृहात राहणारे 229 विद्यार्थी दोन दिवसात कोरोनाबाधितआढळून आले आहेत. त्यामुळे जिल्हाधिकारी षण्मुगराजन एस. यांनी तातडीने निवासी शाळेला भेट देऊन परिस्थितीचा आढावा घेतला.
कोरोनाबाधित विद्यार्थ्यांना योग्य उपचार अन इतर आवश्यक सुविधा पुरवण्याबाबत सूचना केल्या असून या सर्व कार्यवाहीवर देखरेख ठेवण्यासाठी सहाय्यक जिल्हाधिकारी वैभव वाघमारे यांची नोडल अधिकारी म्हणून नेमणूक करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.