देशात कोरोना रुग्ण वाढल्याने प्रशासन चिंतातूर

0
34

देशात कोरोना रुग्णांच्या संख्या पुन्हा एकदा वाढ होत असल्याचे दिसत आहे. गेल्या 24 तासात देशात 10,584 नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. 13,255 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. तर 78 जणांचा मृत्यू झाल्याचे केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडून सांगण्यात आले आहे. आतापर्यंत एकूण 1 कोटी 10 लाख 16 हजार 434 जणांना कोरोनाची लागण झाली असून त्यापैकी 1 कोटी 7 लाख 12 हजार 665 जणांनी कोरोनावर मात केली आहे. कोरोनामुळे देशात एकूण 1 लाख 56 हजार 463 जणांचा मृत्यू झाला आहे. सध्या देशात 1 लाख 47 हजार 306 कोरोनाच्या अॅक्टिव्ह केसेस आहेत. कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी आतापर्यंत 1 कोटी 17 लाख 45 हजार 552 जणांचे लसीकरण करण्यात आले आहे.

दूसरीकडे महाराष्ट्र, गुजरात, केरळ, मध्य प्रदेश आणि छत्तीसगडमध्ये कोरोनाचे रुग्ण वाढत असल्याने इतर राज्यांनी धसका घेतला आहे. या राज्यातून येणाऱ्या पर्यटकांची तपासणी करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. उत्तराखंड सरकारने या पाच राज्यातून येणाऱ्या पर्यटकांना कोरोना चाचणी करण्याचे आदेश दिले आहेत.

पंजाबचे मुख्यमंत्री अमरिंदर सिंग यांनी कोरोनासंदर्भात आढावा बैठक बोलावली आहे. या बैठकीत आरोग्य खात्याचे अधिकारी आणि तज्ज्ञ उपस्थित राहणार आहेत.