चिंता वाढली! देशात कोरोना रुग्णांच्या संख्येत भर

0
45

देशात एका दिवसात कोरोनाचे 14,264 नवे रुग्ण आढळले आहेत. तर 11,667 जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना घरी सोडण्यात आले आहे. तर गेल्या 24 तासात 90 जणांचा मृत्यू झाला आहे. कोरोनाचे रुग्ण वाढत असल्याने पुन्हा एकदा काही भागांमध्ये लॉकडाऊन आणि कडन निर्बंध लागू करण्यात आले आहेत. लसीकरणासोबत कोरोना रुग्णांची साखळी तोडण्याचे मोठे आव्हान प्रशासनासमोर आहे. आतापर्यंत एकूण 1 कोटी 9 लाख 91 हजार 651 जणांना कोरोनाची लागण झाली आहेत. त्यापैकी 1 कोटी 6 लाख 89 हजार 715 जणांनी कोरोनावर मात केली आहे. आतापर्यंत कोरोनामुळे एकूण 1,56,302 जणांचा मृत्यू झाला आहे. सध्या देशात 1 लाख 45 हजार 634 अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. कोरोनाची साखळी तोडण्यासाठी आतापर्यंत 1 कोटी 10 लाख 85 हजार 173 जणांचे लसीकरण केले आहे.