कोरोना लस घेतलेला कर्मचारी पॉझिटिव्ह ! 

0
44

बुलडाणा: कोरोनाचा संसर्ग रोखण्याकरिता देशात सरकारने लसीकरणाला सुरवात केली आहे. यामध्ये बुलढाणा जिल्ह्यातील शेगावच्या शासकीय रुग्णालयातील डॉक्टरांसह कर्मचाऱ्यांना सुद्धा लस देण्यात आली. यात एका कर्मचाऱ्याला २२ जानेवारीला लस देऊनही १५ फेब्रुवारी रोजी या कर्मचाऱ्याला अस्वस्थ वाटत असल्याने त्यांनी कोरोना तपासणीसाठी घशातील स्वबचे नमुने दिले. आणि यामध्ये या कर्मचाऱ्यांचा १६ फेब्रुवारी रोजी कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. आता लस घेतलेला कर्मचारी सुद्धा कोरोना पॉझिटिव्ह आल्याने खळबळ उडाली असून लसीकरण झालेले सुद्धा पॉझिटिव्ह रुग्णसंख्येत भर घालत आहेत. हा कर्मचारी शेगावच्या सईबाई मोटे रुग्णालय येथे उपचार घेत आहे