राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी घेतली कोरोना लस 

0
30

मुंबई: देशात कोरोना लसीकरणाचा तिसरा टप्पा सध्या सुरु झाला आहे. या टप्प्यात ज्येष्ठ नागरिक तसेच 45 वर्षांवरील गंभीर आजार असलेल्या व्यक्तींना लस दिली जात आहे.या टप्प्याला 1 मार्च पासून सुरवात झाली आहे यामुळे आज (५ मार्च) रोजी महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी कोरोना लस टोचून घेतली आहे. त्यांनी मुंबईतील सर जे.जे. समूह शासकीय रुग्णालय येथे जाऊन कोरोनाच्या कोव्हॅक्सीन लसीचा पहिला डोस घेतला. यावेळी वैद्यकीय शिक्षण व संशोधन संचालक डॉ. तात्याराव लहाने, अधिष्ठाता डॉ. रणजीत माणकेश्वर, डॉ. विजय सुरासे आदी उपस्थित होते.
देशभरात २५ लाखांपेक्षा अधिक नागरिकांनी लसीकरणासाठी नोंदणी केली आहे. त्यापैकी, ६.४४ लाख नागरिकांना सोमवारीच लस देण्यात आली आहे.