देवेंद्र फडणवीस यांनी घेतली कोरोनाची लस

0
32

विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी आज जेजे रुग्णालयात जाऊन कोरोनाची लस घेतली. हि माहिती त्यांनी स्वतः हा ट्वीट करून सांगितली आहे. तसेच पात्र व्यक्तींना देखील लस घेण्याचे आवाहन केले आहे.

”जे जे रुग्णालयात जाऊन आज मी कोरोना वॅक्सिनचा पहिला डोस घेतला. हे वॅक्सिन पूर्णतः सुरक्षित असून सर्व पात्र व्यक्तींनी लस अवश्य घ्यावी, ही माझी सर्वांना विनंती आहे.” असे ट्वीट त्यांनी केले आहे.