विश्वास नांगरे यांनी घेतली कोरोना लस, व्हिडीओ जारी करत सर्वसामान्यांना विशेष आवाहन 

0
51

 मुंबईचे सहपोलिस आयुक्त विश्वास नांगरे यांनी कोरोनावरची लस घेतली आहे. मुंबईतील के. ई. एम हॉस्पिटलमध्ये जाऊन त्यांनी लस घेतली. एका व्हिडीओद्वारे त्यांनी ही माहिती दिली आहे. तसेच सर्वसामान्यांना विशेष आवाहनही केले आहे. मुंबईतील के. ई. एम हॉस्पिटलमध्ये जाऊन नांगरे पाटील यांनी कोरोनावरील लस घेतली. लस घेतल्यानंतर त्यांनी रुग्णालय प्रशासनाचे आभार देखील मानले. कोरोना काळात आरोग्य अधिकाऱ्यांनी केलेल्या कामाचे त्यांनी कौतुक केल आहे.

व्हिडीओ मध्ये ते म्हणाले “जय हिंद… मी आज के. ई. एम हॉस्पिटलमध्ये येऊन कोरोनावरची लस घेतली आहे. या लसीमुळे निश्चितपणे फ्रंटलाईनवर काम करणारे पोलिस, आरोग्य कर्मचारी यांना फायदा होणार आहे. आपण सगळ्यांनी मनात कोणतीही किंतु-परंतु न ठेवता लस घ्यावी. जर आपण सुरक्षित असू तर कुटुंब सुरक्षि असेल आणि कुटुंब सुरक्षित असेल तर समाज सुरक्षित असेल. त्यामुळे सगळ्यांनी लस घ्या…”