मैदानातच क्रिकेटरचा हृदयविकाराच्या झटक्यानं मृत्यू

0
91

आज पुण्यातील जुन्नर तालुक्यात असलेल्या बोरी बुद्रुक गावाजवळ मयुर चषक जाधववाडी स्पर्धेत मैदानावर अतिशय दुःखद घटना घडली ओझर व जांबुत हा सामना चालू असताना ओझर संघाचा टेनिस क्रिकेटमधील खेळाडू बाबू नलावडे याचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला आहे. 47 वर्षीय बाबू हा खेळत असतानाच मैदानावर कोसळला. बाबू कोसळताच मैदानातील खेळाडूंनी त्याला रुग्णालयात घेऊन गेले, मात्र त्यापूर्वीच त्याचा मृत्यू झाला होता. बाबू नलावडेच्या निधनावरून परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.