हॉटेलमध्ये मृत अवस्थेत आढळले दमण अन दीवचे खासदार मोहन देलकर, आत्महत्येचा संशय

0
88

दमण अन दीवचे खासदार मोहन देलकर यांचा मृत्यू त्यांचा मृतदेह सोमवारी मुंबईतील एका हॉटेलमध्ये आढळला. मोहन देलकर यांचा मृतदेह मुंबईच्या मरीन ड्राईव्ह परिसरात हॉटेलमध्ये सापडला आहे. घटनेची माहिती मिळताच मुंबई पोलिस घटनास्थळी पोहोचले आहेत.
सुरुवातीच्या तपासात हे आत्महत्येचे प्रकरण असल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र पोलिसांनी अद्याप याची पुष्टी केली नाही सदर प्रकरणाचा तपास सुरू आहे.
मोहन देलकर हे 58 वर्षांचे होते, ते दादरा आणि नगर हवेली लोकसभा मतदारसंघातून अपक्ष खासदार आहेत. १९८९ मध्ये मोहन देलकर पहिल्यांदा या मतदार संघातून खासदार म्हणून निवडून गेले. त्यानंतर ते अनेक वेळा खासदार झाले.