जखमी भाजपा पदाधिकाऱ्याची भेट; दरेकर-सोमैया यांच्याकडून कारवाईची मागणी

0
36

भाजपाचे माजी उपजिल्हाप्रमुख शिरीष काटेकर यांच्या तोंडाल काळं फासून मारहाण केल्याची घटना सोलापूरमध्ये घडली होती. पोलिसांच्या उपस्थितीत शिवसेनेच्या 70-80 कार्यकर्त्यांनी त्यांना मारहाण केली होती. यानंतर शिवसेना पंढरपूर शहराध्यक्ष रवी मुळे यांच्यासह इतरांवर गुन्हा दाखल करण्यात आला होता. वाढीव वीज बिलाविरोधात आंदोलन केल्याने शिवसेना आक्रमक झाली होती. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर आक्षेपार्ह टीका केल्याचा आरोप करत शिरीष काटेकर यांना काळं फासलं आणि साडी नेसवण्याचा प्रयत्न केला होता. यामुळे पंढपुरात तणावाचा वातावरण निर्माण झाले होते.

आज माजी खासदार किरिट सोमैया आणि विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांनी पंढरपूर येथे शिरीष काटेकरांची भेट घेतली. गुंडांवर कडक कारवाई व्हावी, अशी त्यांनी मागणी केली आहे.