सीएनजी- पीएनजी आजपासून महागलं; सर्वसामान्यांना फटका

0
21

दिल्ली-एनसीआरमध्ये सीएनजी आणि पीएनजीच्या दरांमध्ये वाढ झाली आहे. सीएनजी गॅसच्या दरांमध्ये 70 पैसे तर पीएनजीमध्ये 91 पैशांची वाढ झाली आहे. हे नवे दर आजपासूनच लागू झाले आहेत.
सोमवारीच घरगुती गॅसच्या दरांमध्ये 25 रुपयांची वाढ झाली होती. महिन्याभरात घरगुती गॅसचे दर चारवेळा वाढल्याने सर्वसामन्यांचं कंबरडं मोडले आहे. फेब्रुवारीपासून आतापर्यंत 14.2 किलोग्रॅमच्या घरगुती गॅस सिलिंडरचे दर 125 रुपयांनी वाढले आहेत. दिल्लीमध्ये आता 14.2 किलोग्रॅमच्या सिलिंडरचे भाव 794 रुपयांवरुन 819 रुपयांवर आलेत आहेत. ही वाढ सबसिडी आणि विना सबसिडीच्या गॅस सिलिंडरसाठी करण्यात आली आहे.