कृषी कायद्यांविरोधात आज देशव्यापी ‘चक्का जाम’

0
24

दिल्ली: केंद्र सरकारने तीन कृषी कायदे मागे घ्यावे, तसेच शेतीमालाला न्यूनतम हमीभाव मिळावा या मागण्यासाठी शेतकरी दिल्लीच्या सीमेवर एकत्र आले आहेत. शेतकऱ्यांनी आज (शनिवार) दुपारी 12 ते 3 वाजेपर्यंत चक्का जाम आंदोनाची हाक दिलीय. शेतकऱ्यांनी दिल्ली एनसीआरला या आंदोलनातून वगळले असले तरी दिल्ली पोलीस सतर्क आहेत. 26 जानेवारीला झालेल्या हिंसाचारानंतर पोलीस कोणत्याही प्रकराची ढील देण्यास तयार नाहीत. दिल्ली पोलिसांनी सिंघु आणि गाजीपूर सीमेवर विशेष सुरक्षा तैनात केली आहे. दिल्ली पोलिसांनी दिल्लीतील चौकाचौकात 40 हजार सुरक्षारक्षक तैनात केले आहेत. त्यासोबत स्थानिक पोलीसही सहभागी आहेत. दिल्लीतील मेट्रो स्टेशनवर अलर्ट जारी करण्यात आला आहे.

  • कृषी कायद्यांविरोधात आज देशव्यापी चक्का जाम
  • आंदोलन रोखण्यासाठी 40 हजार जवान तैनात
  • दुपारी 12 ते 3 दरम्यान आंदोलनाची हाक
  • सिंघु-गाजीपूर सीमेवर विशेष सुरक्षा
  • दिल्ली-एनसीआरला आंदोलनातून वगळले