जवळपास 15 दिवसांपासून फरार असलेल्या दीप सिद्धूला अटक

0
45

दीप सिद्धूला दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलने मंगळवारी अटक केली आहे. सिद्धू 26 जानेवारीला ट्रॅक्टर रॅली दरम्यान लाल किल्ल्यावर झालेल्या हिंसाप्रकरणी मुख्य आरोपी आहे. दीप सिद्धू जवळपास 15 दिवसांपासून फरार होता. त्यानंतर पोलिसांनी त्याला अटक केली आहे. पोलिसांनी त्याच्यावर एक लाख रुपयांचं बक्षिसही ठेवलं असल्याची माहिती आहे. सध्या त्याला कुठून अटक करण्यात आली हे अद्याप सांगण्यात आलेलं नाही. दीप सिद्धू गेल्या 2 महिन्यांपासून शेतकरी आंदोलनात सक्रीय होता. काही दिवसांआधी दीपला सिख फॉर जस्टीसच्या सोबतच्या संबंधांवरुन एनआयएने नोटीसही जारी केली होती. दीपने गेल्या वर्षी आंदोलनादरम्यान शेतकरी संघटनेच्या नेतृत्वावर प्रश्न उपस्थित केले होते. त्यावेळी त्याने शंभू मोर्चा नावाच्या नवीन संघटनेची घोषणाही केली होती. तेव्हा त्याच्या मोर्चाला खलिस्तान समर्थक चॅनलांपासून समर्थनही मिळालं होतं.

  • शेतकरी आंदोलन प्रकरण
  • दीप सिद्धूला अटक
  • दिल्ली पोलिसांनी केली अटक
  • लाल किल्ल्यावरील हिंसाचारातील मुख्य आरोपी दीप