दिल्ली पोलिसांनी केलेलं मजेशीर ट्वीट प्रचंड व्हायरल

0
35

सध्या देशभरात ‘पावरी हो रही हैं’ हा ट्रेंड सुरु आहे. अनेक जण यावर व्हीडीओ करून व्हायरल करत आहेत, त्याच दरम्यान  दिल्ली पोलिसांचं एक ट्वीट सध्या चांगलंच व्हायरल होताना दिसतंय. रविवारी दिल्ली पोलिसांनी एका हुक्का पार्लरवर छापा टाकत तो बार सील केला आहे. या कारवाईत दिल्ली पोलिसांनी मोठ्या प्रमाणात हुक्का आणि नशेचे पदार्थ जप्त केले आहेत.

त्या हुक्क्याचे फोटो ट्विटरवर शेअर करत पोलिसांनी, की ये हम हैं…ये हुक्के हैं…और अब पावरी नहीं हो रही हैं’ असा एक मजेशीर मेसेज लिहिला आहे. तसेच दिल्ली पोलिसांचं हे मजेशीर ट्वीट चांगलंच व्हायरल होतय. दिल्ली पोलिसांचं हे ट्वीट लोकांच्या केवळ पसंतीस पडलं नाही तर मोठ्या प्रमाणात व्हायरलही झालं.