टूल किट प्रकरणी दिल्ली पोलिसांची कारवाई, बेंगळुरुतून एकाला अटक

0
124
source-greta thunburg twitter handle
source-greta thunburg twitter handle

ग्रेटा थनबर्ग टूल किट प्रकरणी दिल्ली पोलिसांनी कारवाई करण्यास सुरुवात केली आहे. दिल्ली पोलिसांच्या विशेष पथकाने बेंगळुरुमधून 21 वर्षीय पर्यावरणवादी दिशा रवि हिला अटक केली आहे. दिशाने शेतकऱ्यांशी निगडीत टूल किट एडिट केले आणि त्यात काही बाबी अॅड करून पुढे फॉरवर्ड केले असा तिच्यावर आरोप आहे.

ग्रेटा थनबर्ग हीने टूलकिट बाबत एक ट्विट केले होते त्यानंतर तिने ते हटवलं होते. या टूल किट स्क्रिप्टमागे खालिस्तानी संघटना असल्याची माहिती समोर आली आहे. 4 फेब्रुवारीला दिल्ली पोलिसांनी टूल किट प्रकरणी अज्ञात व्यक्तींविरोधात गुन्हा दाखल केला होता.

दिल्ली पोलिसांनी गुगल आणि इतर सोशल मीडिया कंपन्यांकडे टूल किट संबंधी माहिती मागवली होती. शेतकरी आंदोलनाप्रकरणी अमेरिकेची पॉप सिंगर रिहाना आणि ग्रेटा थनबर्ग यांनी ट्विट केले होते. ग्रेटाने आपल्या पोस्टमध्ये टूल किटचा उल्लेख नमूद केला होता. 26 जानेवारीला झालेल्या लाल किल्ला हिंसाचारानंतर दिल्ली पोलीस तपास करत आहेत.