शेगावातील ‘या’ चौकांच्या सौंदर्यीकरणासाठी संभाजी ब्रिगेड सह मराठा पाटील युवक समितीची निवेदनाद्वारे मागणी

0
92

शेगाव :शहरातील राजमाता जिजाऊ चौक आणि छत्रपती संभाजी महाराज चौकाचे सौंदर्यीकरण करण्याची मागणी अनेक दिवसांपासून केली जात आहे.यासाठी आज (१६ मार्च ) रोजी संभाजी ब्रिगेड शेगाव तालुका आणि मराठा पाटील युवक समिती शेगाव शहर यांच्या वतीने निवेदन देऊन मागणी करण्यात आली.याबरोबर शहरातील महापुरुषांच्या नावांच्या चौकात त्यांच्या जयंती व स्मृती दिनी साफसफाई करण्यात यावी अशी मागणी देखील यावेळी करण्यात आली.
छत्रपती संभाजी महाराज स्मृती दिनी स्थानिक चौकात कुठलीही साफसफाई दिसून आली नाही त्यामुळे शिव शंभो प्रेमींनी साफसफाईचे कार्य हाती घेऊन अभिवादन केले. परंतु नगरपालिकेने याबाबद नोंद घ्यावी असे निवेदन देते वेळी चर्चा करण्यात आली.पुढील मासिक सभेत दोन्ही चौकाचे काम पूर्ण करणे तसेच नियोजनासाठी विषय घेत त्यावर अंमलबजावनी करावी अश्या सूचना मिळाल्यास सभेला आम्ही उपस्थित राहू अन्यथा या पुढे सर्वच समविचारी संघटना लोकशाही मार्गाने मागणी करत राहतील आणि पुढील आंदोलनास आपण जबाबदार असाल असा कडक पवित्रा घेतला.
यावेळी संभजी ब्रिगेड शेगाव तालुका जळगाव जा विधानसभा अध्यक्ष विठ्ठल अवताडे मराठा पाटील युवक समिती शेगाव शहर अध्यक्ष श्याम पाटील आढाव कार्याध्यक्ष विठ्ठल लांजुलकर निलेश तिव्हणे तर संभाजी ब्रिगेड जिल्हा उपाध्यक्ष आकाश पवार तालुका सचिव उमेश पाटील अवचार ज्ञानेश्वर निंबाळकर आदी उपस्थित होते