सांगलीत पुणेरी पाट्यांचा फंडा वापरत मावळा प्रतिष्ठानचे शिवजयंतीच्या परवानगीसाठी निदर्शने

0
52

सांगली: यावर्षी कोरोनामुळे अनेक सण साध्या पद्धतीने साजरे केले गेले. येत्या १९ फेब्रुवारीला छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती आहे. महाराष्ट्रात शिवजयंती मोठ्या जल्लोश्यात साजरी केली जाते. यावर्षीची शिवजयंतीही दरवर्षीप्रमाणे उत्साहात साजरी व्हावी व त्यासाठी पारंपरिक पद्धतीने काढण्यात येणाऱ्या मिरवणुकीस परवानगी मिळावी यासाठी प्रशासनाचे लक्ष वेधून घेण्यासाठी पुणेरी पाट्यांचा फंडा वापरत आज मावळा प्रतिष्ठानच्या वतीने अनोख्या पद्धतीने मागणी करण्यात आले.

मावळा प्रतिष्ठान चे ऋषिकेश पाटील म्हणाले, नाशिक आणि सोलापूर सारख्या मोठ्या जिल्ह्यामध्ये शिवजयंती मिरवणुकीस परवानगी मिळत असेल तर सांगली जिल्ह्यातील कोरोना परिस्थिती मोठ्या प्रमाणात नियंत्रणात असतांना सांगलीमध्ये सुद्धा शिवजयंती साजरी करण्यासाठी व शिवजयंतीची सांस्कृतिक व पारंपरिक मिरवणूक काढण्यासाठी परवानगी मिळायला हवी.शिवजयंती सर्व मावळ्यांच्या भावना जोडलेल्या आहेत त्या भावनांचा विचार करुन परवानगी मिळावी यानिमित्ताने आज मावळा प्रतिष्ठानच्या वतीने प्रशासनाचे लक्ष वेधून घेण्यासाठी पुणेरी पाट्यांचा फंडा वापरत आज मावळा प्रतिष्ठानच्या वतीने अनोख्या पद्धतीने मागणी करण्यात आले. यावेळी मावळा प्रतिष्ठान चे ऋषिकेश पाटील , रोहित पाटील , अक्षय सावंत ,जुनेद जमादार,हर्षल पाटील उपस्थित होते.