पुण्यात तरुणीच्या आत्महत्येप्रकरणी देवेंद्र फडणवीस यांनी उपस्थित केले पोलिसांच्या कामगिरीवर प्रश्न

0
20

शुक्रवारी भाजपा नेते देवेंद्र फडणवीस यांनी पुणे शहरातील एका 23 वर्षीय तरुणीने केलेल्या आत्महत्येप्रकरणी एफआयआर दाखल करण्यात पोलिसांकडून उशीर होत असलेल्या प्रकरणाची कसून चौकशीची मागणी केली आहे. त्यांनी पत्रकारांना सांगितले की त्यांनी या घटनेबाबत महाराष्ट्र पोलीस महासंचालकांनापत्र लिहून त्यांचा हस्तक्षेप करण्याची मागणी केली आहे. बीड जिल्ह्यातील रहिवासी पूजा चव्हाणचं सोमवारी पहाटे पुण्याच्या हडपसर भागात एका फ्लॅटच्या बाल्कनीतून खाली पडून मृत्यू झाला. तिचे राज्यमंत्र्यांशी संबंध असल्याचा दावा काही सोशल मीडिया पोस्ट्सने केला होता. ही महिला टीकटॉक आणि इंस्टाग्राम सारख्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर तिच्या व्हिडिओंमुळे ओळखली जात होती.