देवेंद्र फडणवीसांनी राष्ट्रवादीच्या मंत्र्यांविरोधात दाखल केले हक्कभंग

0
23

मुंबई: मनसुख हिरेन मृत्यूप्रकरणावरून सभागृहात भाष्य करणारे राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आता थेट गृहमंत्री अनिल देशमुख आणि अशोक चव्हाण यांच्यावर हक्कभंगाची कारवाई करण्याची मागणी केली आहे.
गृहमंत्री अनिल देशमुख यांनी काल सभागृहात माझ्याविरोधात खोटी माहिती दिली. असून अन्वय नाईक हे प्रकरण मी दाबलं, असा उल्लेख त्यांनी केला. 306 नुसार ही केस होऊ शकत नाही, असं कोर्टाने म्हटलं. तरीही अनिल देशमुखांनी सभागृहात माझ्यावर आरोप केले. हा माझ्यावर दबाव आणण्याचा प्रयत्न आहे. गृहमंत्र्यांनी खोटं बोलून माझ्या विशेष अधिकाराचं हनन केलं. त्यामुळे आपण त्यांच्याविरोधात हक्कभंग दाखल करत असल्याचे देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.तसेच अशोक चव्हाण यांनी मराठा आरक्षणाबाबत खोटी माहिती दिल्यामुळे आपण त्यांच्यावर हक्कभंग दाखल करणार असल्याची माहिती देवेंद्र फडणवीस यांनी दिली.