कोरोना नियमावली मोडल्याने खासदार महाडिक यांच्याविरोधात गुन्हा

0
47

महाराष्ट्रात कोरोनाचे रुग्ण वाढत असताना लग्न समारंभ आणि सोहळ्यातील वाढती गर्दी चिंता वाढवणारी आहे. त्यामुळे लग्नात उपस्थितांची मर्यादा घालून देण्यात आली आहे. मात्र अनेक जण या नियमावलीला हरताळ फासताना दिसत आहेत. त्यावर आता प्रशासनाने कडक पावलं उचलण्यास सुरुवात केली आहे. खासदार धनंजय महाडिक आणि इतर दोन जणांवर कोरोना नियमावली मोडल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. महाडिक यांच्या मुलाचं 21 फेब्रुवारीला लग्न होते. या लग्नाला अनेकांनी हजेरी लावल्याने कोरोना नियमावलीचे तीन तेरा वाजवले होते. लग्नाला हजेरी लावलेल्या मंत्री भुजबळ यांना कोरोना झाल्याचं त्यानंतर समोर आले. त्यामुळे लग्नात उपस्थित असलेल्यांचे धाबे दणाणले आहेत. या लग्नाला राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, भाजपा नेते आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचीही उपस्थिती होती.