‘कोंबडी पळाली’ घालतंय सातासमुद्रापार धुमाकुळ,

0
45

काही गाणी हि इतक्या प्रमाणात व्हायरल होतात, कि बाहेर देशातील लोक देखील त्या गाण्यावर ठेका धरतात. तसेच मराठी गाण्यावर बाहेर देशातील लोकांनी डान्स करणे आणि ते गाणी एन्जॉय करणे हे आपल्यासाठी अभिमानास्पद आहेच. असाच एक व्हिडिओ मराठीतील सुपरस्टार भरत जाधव यांनी शेअर केला आहे. या कलाकाराने खूप कमी वेळेत रसिकांच्या मनात आपले स्थान निर्माण केलं आहे.

जत्रा या चित्रपटातील ‘कोंबडी पळाली’ या गाण्याने रसिकांना अक्षरक्षा वेड लावलं, तसेच क्रांती रेडकर आणि भरत जाधव यांना नवी ओळख मिळाली.

भरत जाधवने एक व्हिडीओ चाहत्यांसह शेअर केला आहे. त्यामध्ये एक फॉरेनर या गाण्यावर ठेका धरल्याचे पाहायला मिळतंय. तसेच या व्हिडीओला भरभरुन लाईक्स मिळाले आहे.