दिग्दर्शक संजय लीला भंसाळी यांना कोरोनाची लागण

0
32

बॉलिवूडमध्ये देखील कोरोनाने पुन्हा एकदा डोकेवर काढले आहे. सुप्रसिद्ध दिग्दर्शक संजय लीला भंसाळी यांनाही कोरोना झाल्याची माहिती समोर येतेय. यामुळे आता ‘गंगूबाई काठियावाडी’ या चित्रपटाचं शूटिंग पुर्णपणे थांबवण्यात आल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. सध्या या चित्रपटाचं शूटिंग मुंबईतील फिल्मसिटीमध्ये सुरू आहे. या चित्रपटात अलिया भट्ट मुख्य भूमिकेत दिसणार आहे. यापूर्वी देखील कोरोनाच्या वाढत्या संसर्गामुळे गंगूबाई काठियावाडी या चित्रपटाचं शुटींग लांबवण्यात आलं होतं.