शेतकरी आंदोलनाशी निगडीत टूलकिट प्रकरणी दिशा रविला आज कोर्टात हजर करण्यात आले. दिल्ली पोलिसांनी कोर्टात पाच दिवसांची पोलीस कोठडी मागितली. मात्र कोर्टाने दिशाला एक दिवसाची पोलीस कोठडी देण्याचा निर्णय दिला. आता दिशा रविची अन्य आरोपींसोबत चौकशी होणार आहे. दिशा रविने शांतनु आणि निकिता आरोप केल्याने आता समोरासमोर चौकशी केली जाणार आहे.
टूलकिट प्रकरणी पोलिसांनी पर्यावरणवादी दिशा रविला अटक केली आहे. तिच्यावर शेतकरी आंदोलनादरम्यान हिंसा पसरवण्याचा ठपका ठेवण्यात आला आहे. 17 आणि 18 जानेवारीला झालेल्या झुम मीटिंग झाली. त्यानंतर 23 जानेवारीला टूलकिट तयार केल्याचा दावा दिल्ली पोलिसांनी केला आहे.